धरणगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी मोटार सायकल चोरीची तक्रार धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र येथे दाखल झाली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरी केलेल्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत. संभाजी बाळु पाटील, निलेश रविंद्र पाटील असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र भाग ५ गु.र.न. ०४१५/२०२१ भा.द.वी. कलम ३७९ प्रमाणे दि.०३/१२/२०२१ रोजी दाखल झाला असून यातील फिर्यादी योगेश दिलीप तांबट (वय ३५ वर्ष रा. कांचन नगर जळगाव) यानी त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.१९. बी. एस. ८५९२ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली बाबत तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता संभाजी बाळु पाटील (वय २० वर्ष रा. सातरणे ता.जि. धुळे), निलेश रविंद्र पाटील (वय २१ वर्ष रा. सबगव्हाण ता. अमळनेर जि.जळगाव) या आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडुन गुन्ह्यात चोरी केलेल्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश बुवा, पो.हे. काँ २२६८ गजानन महाजन, पोहेकॉ. १६९७ विजय चौधरी, पो.हे. कॉ. २२८५ अरुण निकुभ, पो.हे. काँ १६३ संजय महाजन, पोना, २३१९ उमेश भालेराव, पोकॉ. २९ अमोल सुर्यवंशी, पो.काँ. ७९ ज्ञानेश्वर बाविस्कर, पोकॉ. २१८ किशोर चंदनकर यांचे पथक तपास करीत आहे.
मोटरसायकल घेऊन जाण्याचे आवाहन
हिरो कंपनीची एचएफ डीलक्स सिल्वर रंगाची, स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची (MH19.DN.6430), होंडा युनिकोन काळ्या रंगाची, टीव्हीएस स्पोर्ट्स काळ्या व लाल रंगाची (MH19.BB.8756), हिरो कंपनीची एचएफ डीलक्स सिल्वर रंगाची ( (MH19.AL.2141), हिरो कंपनीची एचएफ डीलक्स निळ्या व काळ्या रंगाची ( (MH19.BS.8592) या मोटर सायकल आरोपींनी पाळधी, धरणगाव, अमळनेर हद्दीतून चोरी केल्याचे सांगत असल्याने मोटारसायकल कोणाच्या असल्यास पाळधी पोलीस दूरक्षेत्र. तालुका धरणगाव येथे संपर्क करावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.