पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंदा पाटील यांची कन्या तथा मु.जे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मृणाली पाटीलने १२ वी वाणिज्य विभागात ९६.८३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, मृणालीला तब्बल दोन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
मु.जे. महाविद्यालयाची विद्यार्थीनी मृणाली गाेविंद पाटील हिला बारावी (काॅमर्स) च्या परिक्षेत ९६.८३ टक्के गुण मिळाले. ती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंद पाटील यांची कन्या आहे. सुरूवातीपासूनच मृणालीने सीए होण्याचा निश्चय करून वाणिज्य शाखेत प्रवेश घेवून हे यश मिळविले आहे. मृणालीने बुक कीपिंग अकाऊंटंसी आणि आयटी या दोन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. वडील गोविंद पाटील, आई जयश्री पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मृणालीला मार्गदर्शन मिळाले. तर तिच्या यशाबद्दल जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, धरणगावचे माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी अभिनंदन केले असून मृणालीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.