TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

MS धोनीचे टीम इंडियात कमबॅक, निभावणार ‘ही’ भूमिका

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in क्रीडा, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने काल रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये १५ सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे. MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर म्हणजे मार्गदर्शक असेल. शिवाय फिरकीपटू आर. अश्विनलाही तबब्ल चार वर्षानंतर भारताच्या टी-२० संघात संधी देण्यात आली आहे.

धोनीने आतापर्यंत आपल्या व्यूव्हरचनेने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. शक्य नसतानाही अनेक विजय शक्य करुन दाखवले. कधी आक्रमक धुव्वाधार खेळी करुन तर कधी स्टम्प्सच्या मागे राहून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनाकलनीय बदल करुन आता टी ट्वेन्टी क्रिकेट संघात धोनी खुद्द मैदानावर नसेल पण मैदानाबाहेर राहून तो विराटसेनेला प्रतिस्पर्ध्याना चितपट करण्याचे धडे देणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी धोनीची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी निवड केलीय.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

दरम्यान, धोनी आणि विराटची जोडी वर्ल्डकप गाजवणार आणि रोहित-विराट-धोनीचे REUNION’ पाहायला मिळणार, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. या संघात अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, इशान किशन सारख्या युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि कृणाल पंड्या यांना संघात स्थान मिळवता आलेले नाही. एवढेच नव्हे, तर लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलची देखील टी-२० वर्ल्डकप संघात निवड झालेली नाही.

भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या अटी आणि सूचना जारी केल्या आहेत. या स्पर्धेसाठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
Next Post

खळबळजनक : बँकेतून निघताच एकाचे पंधरा लाख रुपये लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील हेडगेवार नगर शिवारातून कापूस चोरी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 13, 2024

सौदे पावतीच्या नावावर डॉक्टरला ५१ हजारात फसविले!

September 25, 2022

जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत चाळीसगावात तक्रार निवारण सभा संपन्न

August 8, 2025

प्रेरणादायी : ७२ वर्षीय ईश्वर रामटेके यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धेत गाजवला आखाडा !

February 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group