TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक रस्त्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेत औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीजबिल वसुलीस वेग आला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. थकबाकीदार ग्राहकही वीजबिल लगेचच भरून मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात येत आहे. औरंगाबाद शहराबरोबरच जिल्ह्याचा ग्रामीण भाग तसेच जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत महावितरणची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहक नियमित व वेळेत वीजबिल भरत आहेत का हे पाहण्यासाठी महावितरण कर्मचारी आता घरोघरी जाऊन वीजबिल भरल्याची खात्री करत आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

औरंगाबाद शहरात शहागंज व छावणी उपविभागात 4 व 6 जानेवारी रोजी राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले हे स्वत: सहभागी झाले. तसेच औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, अधीक्षक अभियंता (इन्फ्रा) संजय सरग, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्यासह औरंगाबाद शहर मंडलातील विविध कार्यालयांतील अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी या मोहिमेत ग्राहकांना भेट देऊन वीजबिलांची वसुली केली.

ग्राहकांना वीजबिलाबाबत असलेल्या शंकांचे तात्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाईन भरण्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले. तसेच ज्या ठिकाणी ग्राहकास वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण होती किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नव्हते त्यांच्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम स्वीकारून अॅपद्वारे वीजबिल भरणा करून घेतला. त्यांना बिल भरल्याचा तात्काळ मोबाईलवर एसएमएस पाठवण्यात आला. या मोहिमेत शेकडो ग्राहकांनी तातडीने बिल भरून सहकार्य केले. ज्यांनी बिल भरण्यास प्रतिसाद दिला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले. वीजबिल वसुलीसोबतच या मोहिमेत वीजचोरीची प्रकरणेही उघडकीस आली. या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात येणार आहेत. तसेच संशयास्पद वीजवापर आढळलेले ग्राहकांचे मीटर जप्त करून तपासणी केली जाणार आहे.

शहागंज उपविभागात 4 जानेवारी रोजी राबवलेल्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वसुली मोहिमेत 163 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर 52 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तसेच 750 ग्राहकांनी वीजबिल भरून वीज खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळली. तर छावणी उपविभागात 6 जानेवारी रोजी राबवलेल्या मोहिमेत 187 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर 93 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तसेच 283 ग्राहकांनी वीजबिल भरून वीज खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळली. सर्व वीजग्राहकांनी थकबाकीसह आपले चालू वीजबिल भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Could Red Dog Be Just The Right Casino For You, Even Without Live Games?

November 20, 2022

निलेश पाटील यांचा सहकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश

November 16, 2021

धक्कादायक : नोकरी लावतो म्हणत एक लाखही घेतले अन् अनैसर्गिक अत्याचारही केला ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

April 5, 2023

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group