जळगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले मुख्तार खान सफदरखान पठाण हे प्रदीर्घ काळ सेवा करून सेवानिवृत झाले आहे. पोलीस मुख्यालय जळगाव येथे त्यांचा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्तार खान यांनी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यात पोलिस वाहतूक सेवा, जिल्हा पेठ, भुसावळ बाजार पेठ, रावेर पोलीस स्टेशन जळगाव, अशा विविध ठिकाणी सेवा झाली आहे. जळगाव येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार समारंभ पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब परिवारासह उपस्थित होते.
















