चाळीसगाव (प्रतिनिधी) तथागत भगवान बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंती निमित्त महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटर येथे चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायत च्यावतीने मल्टी पॅरा मॉनिटर संचांचा लोकार्पण सोहळा दि. २६ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायत अध्यक्ष माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, उपाध्यक्ष माजी आमदार ईश्वर जाधव, सरचिटणीस धर्मभूषण बागुल, कार्याध्यक्ष प्रभाकर जाधव, चिटणीस रामचंद्र जाधव, कोषाध्यक्ष गौतम झालटे, कार्यकारी सदस्य कालिदास अहिरे, महेश चव्हाण, आनादराव जाधव, गौतम जाधव, किरण जाधव, ऍड. राहुल जाधव आदी पदाधिकारी, सदस्य व सर्व समाज बांधव उपस्थित राहणार आहे. सदर लोकार्पण सोहळा हा कोरोना असल्याने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
















