मुंबई (वृत्तसंस्था) अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले आहेत (New Zonal Director of Narcotics Control Bureau). अमित गवाटे (Amit Fakkad Gawate) हे आता नवे झोनल डायरेक्टर असणार आहेत.
एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. तीन अधिकाऱ्यांच्या निवडीचं हे पत्र आहे. यात अमित घावटे यांची झोनल डायरेक्टर बंगळुरु आणि चेन्नईमधून मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे. घावटे यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही या पत्रात उल्लेख आहे. यामध्ये अमनजितसिंह यांची चंदीगढ एनसीबी झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे तर ग्यानेंद्रकुमार सिंह यांची झोनल डायरेक्टर दिल्ली इथं नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित NCBचे दोन अधिकारी निलंबित
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित NCBच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर या दोन अधिकाऱ्यांची बदली गुवाहाटीला करण्यात आली. या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन आर्यन खान प्रकरणामुळे करण्यात आले नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.