TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार : महापौर जयश्री महाजन

१८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न : सात बालनाट्यांचे झाले सादरीकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लहान मुलांतील सुप्त कलागुणांचा विकास होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात संपन्न झाले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, अरुंधती अभिषेक पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

नटराज पूजनाने स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना स्पर्धेचे समन्वयक दिपक पाटील यांनी सांगितले की, बालरंगभूमीचा विचार अधिक गांभीर्याने घेऊन भविष्यात तरी बालरंगभूमी समृद्ध करायची असेल, तर पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो, तसं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी बालरंगभूमी ही गरज आहे. मुलांचा केवळ आय.क्यू. न वाढवता इ.क्यू. (इमोशनल कोशंट) वाढवणेदेखील गरजेचे आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. नाटक सादर करणं हा तर व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहेच. पण चांगली बालनाट्यं पाहून एक सुजाण प्रेक्षक घडवणं ही काळाची गरज आहे. टीव्ही, कम्प्युटरला चिकटलेली, कार्टुनच्या मोहपाशात अडकलेली मुलं भविष्यात समाजाला धोकादायक बनू शकतात. कार्टुनच्या अतिरेकाचे दुष्परिणाम परदेशात मनोविकारतज्ज्ञांना चिंताजनक वाटू लागले आहेत.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

त्यानंतर उद्‌घाटनपर भाषणात बोलतांना सांगितले की, बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या कायापालटाला सुरुवात झाली असून, रंगमंचाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कलावंतांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सोयीसुविधांयुक्त असे नाट्यगृह देण्याचा आमचा मानस असून, त्यादृष्टीने आमचे सर्व नियोजन सुरु आहे. यावेळी अरुंधती अभिषेक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होत असतांना, त्यांचे प्रसंगावधान, स्टेजडेअरींग वाढते. तसेच त्यांची स्मरणशक्ती अधिक तल्लख होते. उद्याचा सर्वगुणसंपन्न सुजाण नागरिक या मुलांमधूनच घडणार आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने मुलांबरोबर पालकांनीही बालनाट्यं पाहिली पाहिजेत आणि बालरंगभूमीवर नेमकं काय दाखवलं जात आहे, त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो आहे, हे गांभीर्याने बघितलं पाहिजे. शाळा कलाविकासाबाबत काही करत नाही म्हणून गप्प बसण्यापेक्षा आपल्या मुलांना हे कलाप्रकार शिकवून, दाखवून त्यांना कलाकार किंवा एक रसिक म्हणून तयार करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.

आज महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सात संघांनी आपले सादरीकरण केले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगावचे अमोल संगीता लिखीत दिपक महाजन दिग्दर्शित सहल, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे रमेश पवार लिखीत संदीप घोरपडे दिग्दर्शित माझ्या मामाचं पत्र हरवलं, भारती शिक्षण संस्था जळगाव यांचे विभावरी मोराणकर लिखीत सुनिता पाटील दिग्दर्शित भूत, हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईचा यांचे विश्वंभर पुरी लिखीत मनोज ठाकूर दिग्दर्शित निर्बुध्द राजाची नगरी, लोकमंगल कलाविष्कार धुळे यांचे प्रकाश पारखी लिखीत सुजय भालेराव दिग्दर्शित एप्रिल फुल, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली यांचे प्रांजल पंडीत लिखीत विनय अहिरे दिग्दर्शित कॉपीबहाद्दर, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ यांचे अमोल संगीता लिखीत अलका भटकर दिग्दर्शित गुणांच्या सावल्या ही बालनाट्ये सादर झालीत. आज (दि.२३) रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सात बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.

या बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे व स्पर्धेचे जळगाव समन्वयक दिपक पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

May 24, 2022

धक्कादायक : सासरच्या जाचाला कंटाळून अनोरे येथील विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल !

March 21, 2024

अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अमळनेर मतदारसंघासाठी 1 कोटींचा निधी

April 6, 2022

अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड !

July 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group