TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ! सीरममधून पहिला कोव्हिशील्ड लसीचा साठा मुंबईत दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे. बुधवारी पहाटे याचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झाला असून मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. १ लाख ३९ हजार ५०० कुप्या मुंबईत पोहोचल्या आहेत.

केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आज पहाटे ५.३० वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने पुण्याहून मुंबईत आणला. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहनं सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे. मुंबईत लस साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आलं आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर झालेली आहे. मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. १६ जानेवारीला मुंबईत लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्षात लसीकरणाच्या दिवसाची मुंबईकर आतूरतेनं वाट पाहात आहेत.

राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई ३, कोल्हापूर १, पुणे २ लसीच्या व्हॅन पोहचल्या आहेत तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आज राज्यातील २६ ठिकाणी लसीच्या व्हॅन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी १३ शहरांमध्ये लसीचा पहिला साठा ८ विमानांच्या सहाय्यानं पोहोचवण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

April 16, 2021

सापावर पाय पडला पण सर्पदंश झाला नाही…तरीही ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

September 18, 2023

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील Dedicated कोरोना केअर सेन्टर

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group