TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्ख्या भाच्याच्या प्रेमात पडली मामी ; मार्गातील काटा काढण्यासाठी मामाचा खेळ केला खल्लास

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पटना (वृत्तसंस्था) बिहारची राजधानी पटनामधून अनैतिक संबंधामुळे नात्यांना काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एक भाचा आपल्या मामीच्या असा काही प्रेमात पडला की, त्याने मामीला मिळवण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून आपल्या मामाची हत्या केली. हे प्रकरण पटनाच्या दिदरगंज फतेहपूर येथील आहे. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी गुरुवारी मृत व्यक्तीची पत्नी, भाचा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

फतेहपूर येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस सतत त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक एके दिवशी दिदारगंज पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आला आणि मृत व्यक्तीचा फोटो पाहून त्याने पोलिसांना सांगितले की हा त्याचा भाऊ आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती आली. मृत व्यक्तीचे नाव सूरज असे आहे. यावेळी पोलिसांनी इतर नातेवाइकांनी या घटनेची माहिती दिली आणि त्यांना चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, मृत सूरज हा त्याच्या सासरच्या घरी राहत होता आणि ६ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, सूरज हा काही दिवसांपासून खूप अस्वस्थ होता.

पोलिसांनी अशी केली गुन्ह्याची उकल

पाटणाच्या एसएसपींनी याप्रकरणी विशेष टीम तयार करून तपास सुरू केला होता. त्यानंतर जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक अशीच होती. एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मृत सूरजच्या पत्नीची चौकशी केली असता पोलिसांना तिचा काहीसा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. ज्यानंतर हत्येची संपूर्ण घटना उघडकीस आली.

दरम्यान, नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, चार वर्षांपूर्वी सूरजचा विवाह खानापूर येथील काजलसोबत झाला होता. यादरम्यान दोघांना एक मूलही झाले होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण शेजारी राहणारा भाचा अनेकदा मामीला भेटायला यायचा. याच कारणावरून सूरज आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने भांडण व्हायचं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा कामाला निघून गेला की, भाचा आपल्या मामीला भेटण्यासाठी यायचा. याचवेळी दोघांमध्ये अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले होते. बहुतेक वेळा भाचा हा त्याच्या मामीसोबतच असायचा. यादरम्यान, दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान सूरज हा अवैध दारूशी संबंधित एका गुन्ह्यात तुरुंगात गेला. त्यामुळे मामी-भाचा अधिकच जवळ आले होते.

तुरुंगातून आल्यानंतर सूरजला पत्नीच्या अनैतिक संबंधाची मिळाली माहिती

सूरज जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आणि त्याला पत्नीचे आपल्याच भाच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळाली. याच गोष्टीला सूरजने प्रचंड विरोध केला. जेव्हा हा सगळा प्रकार भाच्याला (आकाश) समजला तेव्हा आकाशने त्याचा मित्र अजित याच्यासोबत मामाच्याच हत्येचा कट रचला.

७ फेब्रुवारी रोजी आकाशने मामा सूरज याला त्याचा मित्र अजित याच्या टेम्पोमध्ये बसवले. यावेळी तिघेही भरपूर दारू प्यायले. यावेळी त्यांनी नियोजनानुसार सूरजला आणखी दारू पाजली. दारू पिऊन सूरज बेशुद्ध झाल्यानंतर आकाशने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि त्याचा मृतदेह फतेहपूर येथे फेकून दिला. यावेळी पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू जप्त केला असून अटक करण्यात आलेल्या आरोपी मामी, भाचा आकाश आणि त्याच्या मित्राची कारागृहात रवानगी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

Horoscope : राशीभविष्य, शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज 'हग डे'ला कसा असेल तुमचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 17, 2024

धक्कादायक : मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे दिल्लीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू !

March 31, 2023

आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप !

July 8, 2023

तडीपार टकल्या गवळीकडून खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

January 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group