जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’ वाद प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनवाई सुरू आहे. न्यायालयाने आज भोईटे गटाचे प्रमुख तानाजी भोईटे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी भोईटेंची बाजू मांडली.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन (girish mahajan), सुनील झंवर (sunil zavar) आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक (rameshwar naik) यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन गटांमधील वादात एकाला धमकावल्याप्रकरणी कोथरूड पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत मुंबई हायकोर्टात सुनवाई सुरु आहे. याप्रकरणी आज मुख्य संशयित तानाजी भोईटे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी माजी मंत्री गिरीश महाजन,सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर २९ संशयित पैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या नऊ जणांवर ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले होते. यात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी भोईटे गटाचे प्रमुख तानाजी भोईटे यांना अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना म्हटले की, या गुन्ह्यात आधीच संशयितांना अटकेपासून संरक्षण नाही तसेच भोईटे हे वयोवृद्ध जीवन जगत आहे तर गुन्हा देखील उशिराने दाखल झाला आहे त्यामुळे इतर संशयितांनी प्रमाणे तानाजी भोईटे यांना देखील अटकेपासून संरक्षण मिळावे असे अॅड.अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. त्यावर सरकार पक्षाने देखील 24 तारखेपर्यंत अटक करणार नाही अशी हमी न्यायालयात दिली. त्यामुळे त्यानुसार आज न्यायालयाने इतरांप्रमाणे भोईटे गटाचे प्रमुख तानाजी भोईटे यांना देखील अटकेपासून संरक्षण दिले आहे.