TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माय लॉर्ड, युद्धनौकेच्या नावावर पैसा लाटणे हा देशद्रोह नाही का? ; शिवसेनेचा सवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. मात्र, सोमय्या यांना ज्या मुद्द्यांच्या आधारावर जामीन दिला गेला, त्याबद्दल शिवसेनेनं खंत व्यक्त केली आहे. युद्धनौकेच्या नावावर पैसा लाटणं हा देशद्रोह नाही का, माय लॉर्ड, तुम्हीच सांगा,’ अशी विनंती शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.

काय म्हटलंय सामना अग्रलेखात?

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांचीच ही अवस्था तर सामान्यांचे काय? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा!

‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा करून अपहार करणाऱ्या संशयित गुन्हेगारांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. पैसे गोळा करणाऱ्या माफिया टोळीचे सूत्रधार किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र हे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यावर ते प्रकट झाले. ज्यांच्यावर पैशांच्या अपहाराचे गुन्हे दाखल झाले व न्यायालयाने ज्यांना पोलीस स्टेशनात रोज हजेरी लावायला सांगितले असे सोमय्या हे महाविकास आघाडीचे म्हणे घोटाळे बाहेर काढणार आहेत! सोमय्या यांच्यावरच घोटाळय़ासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. ‘आयएनएस विक्रांत वाचवा’च्या नावाखाली त्यांनी मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केले, हे पैसे राजभवनात जमा करू असे त्यांचे वचन होते. ती रक्कम मधल्यामध्ये गायब झाली. राजभवनाने तर पैसे जमा झालेच नाहीत असे लेखी सांगितले, पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही. स्वतः आरोपीचे वकील कबूल करतात की, पैसे गोळा केले ते राजभवनात जमा केलेच नाहीत. आरोपीने ते भाजपच्या कार्यालयात जमा केले. भाजप कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल.

आरोपी सोमय्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला तेव्हा सत्र नोंदवली. ती म्हणजे, ‘सोमय्या व त्यांच्या मुलाने बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले. त्यांनी कोणत्याही कॉम्पिटंट ऍथॉरिटीची परवानगी घेतली नव्हती. हे कृत्य अप्रामाणिकपणाचे आहे. जनतेतून पैसे गोळा केले हे सकृतदर्शनी स्पष्टच दिसत आहे.’ हे जमा झालेले पैसे सोमय्या पिता-पुत्रांनी कोणालाही दिले नाहीत व जमा केलेल्या पैशांचा हिशेब ठेवला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला. जामीन नाकारताच आरोपी बाप-बेटे फरार झाले. आता आपल्या विद्वान हायकोर्टाने आरोपीला दिलासा देताना काय सांगितले ते पहा – तक्रार बऱयाच वर्षांनी दाखल झाली. 2013 ते 2022 मध्ये तक्रार दाखल झाली नाही आणि घोटाळय़ाचा 57 कोटींचा आकडा कुठून आणला? पुरावा काय? वृत्तपत्रांतील बातम्यांवरून तक्रारदाराने गुन्हा दाखल केला. आदरणीय न्यायालयास साष्टांग दंडवत घालून विनम्रपणे सांगू इच्छितो की, माय लॉर्ड, 2013 साली पैसे गोळा केले. ते राजभवनात जमा झाले असे देणगीदारांना वाटले, पण राजभवनानेच 2022 साली घोटाळा उघड केल्यावर देणगीदार हादरले व आपली फसवणूक झाली म्हणून पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करायला गेले. यात काय चुकले? घोटाळा 57 कोटींचा की 57 रुपयांचा हे तपासात सिद्ध होईल, पण मुख्य आरोपी सोमय्या व त्यांच्या मुलाने विक्रांतच्या नावावर

केले व अफरातफर केली हा गुन्हा आहेच. त्या अफरातफरीच्या गुन्ह्यास रंगसफेदी करता येणार नाही. बँकेत, पतपेढय़ांत, सार्वजनिक उत्सव मंडळात शे-पाचशे रुपयांचा हिशेब लागत नाही म्हणून फसवणुकीच्या गुह्याखाली न्यायालयाने सामान्य लोकांना जेलात पाठवले आहे. येथे मात्र चोराला पकडले म्हणून न्यायालयाने पोलिसांनाच दटावले आहे. सध्या गाजवली जात असलेली पत्रा चाळ, गोवावाला कंपाउंड प्रकरणे तर 2013 च्या आधीची आहेत व ती उकरून काढून महाविकास आघाडीच्या लोकांवर खटले भरले गेले व त्यांना तुरुंगात पाठवले गेले, पण दुसऱ्या बाजूला मुंबै बँकेपासून ते विक्रांत निधी घोटाळय़ात ठोस पुरावे असताना न्यायालय जामीन देत आहे. दिशा सॅलियन प्रकरणातही महिला आयोगाच्या तक्रारीची दखल न घेता आरोपींना दिलासा दिला. महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांचीच ही अवस्था तर सामान्यांचे काय? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा : खडसेंचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

September 6, 2023

बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार : श्रीराम पाटील !

April 28, 2024

दिल्लीत इस्राइलच्या दुतावासाजवळ स्फोट, वाहनांचे नुकसान !

January 29, 2021

खंडव्यात रेल्वेचा ब्लॉक, आठ रेल्वे गाड्या रद्द ; आठ गाड्या उशिराने धावणार !

July 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group