चोपडा (प्रतिनिधी) : भाऊबीज निमित्त ना.गुलाबराव पाटील चोपड्यात दोघं बहिणींकडून ओवाळून घेत आशीर्वाद घेतले.
भाऊबीज निमित्त पाणी पुरवठा मंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील चोपडा येथिल गणेश कॉलनी स्थित जगन्नाथ सी.पाटील यांच्याकडे आपल्या थोरल्या बहिण सौ सुशिलाबाईच्या हस्ते ओवाळुन घेत आशीर्वाद घेतले यावेळी आपल्या भावाला पेढा भरवत सौ सुशिलाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले यावेळी नामदार गुलाबराव पाटील देखील भावनिक झाले होते पंरतु आपल्या बहिणीला धीर देत म्हणाले की,तुझा भाऊ नेहमी तुझा पाठशी आहे.चिंता करू नको आणि चोपड्यात आलो तर तुम्हाला भेटण्यासाठी मी येतच असतो ना …! असे सांगून धीर दिला. मात्र बहिणीने ही सांगितले की,मला काहीच नको परंतु न चुकता रक्षाबंधन, भाऊबीज ला येतो इतका व्याप असल्यावर सुद्धा येतो म्हणून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले.यावेळी घरातील भावनिक वातावरण पाहून उपस्थित असलेले सर्वच जण पाहतच होते.