जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग जवळील अजिंठा चौफुलीच्या प्रवेशद्वाराजवळ भारताचे स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न व स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री ज्यांनी भारत देशात युजीसी, आयआयएम, आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्थांचा पाया रचला असून त्यांचे प्रमुख प्रवेशव्दाराला मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव द्यावे, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध बिरादरीचे शिष्टमंडळातर्फे महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.
११ नोव्हेंबर २० रोजी त्यांची १३२ वी जयंती संपूर्ण भारतात राष्ट्रिय शिक्षण दिवस म्हणून साजरी होत असल्याने मौलाना अबूल कलाम आझाद या थोर पुरुषाचे नाव जळगाव शहरातील मुख्य प्रवेशद्वाराला देण्यात यावे जेणेकरून पुढील पिढी त्यांच्या कार्याचे स्मरण करेल. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी केलेले कार्य व संसदेत जाहीरपणे धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मितीला विरोध करणारे ते महान नेते होते म्हणून त्यांचे नामकरण करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
दिवाळी निमित्त इस्लामी मराठी पुस्तके वाटप
सर्व प्रथम मराठी भाषेतील अंतिम प्रेषित यांचे जीवन चरित्र ही पुस्तके महापौर व आयुक्त तसेच इतर नगरसेवक यांना मझहर खान ,शकील टिक्की, नदीम काझी, सलीम इनामदार व अनवर खान यांच्या हस्ते देण्यात आली.
निवेदन देण्यासाठी यांची होती उपस्थिती
फारूक शेख व बाबा देशमुख यांनी महापौर व आयुक्त यांना निवेदन दिले. तसेच या निवेदनावर नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवकचे प्रतिनिधी अक्रम देशमुख व हाजी युसुफ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख, मनियार बिरादरी प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सलीम इनामदार, जळगाव काँग्रेस शहराध्यक्ष नदीम काझी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मजहर खान, जळगाव शहर मन्यार बिरादरी अध्यक्ष सय्यद चांद, शिकलकर बिरादरीचे अन्वर खान, अक्सा बॉईजचे एडवोकेट अमीर शेख, अल खैर ट्रस्टचे युसुफ शह, रोशनी एज्युकेशन सोसायटीचे अडव्होकेट अय्युब खान, मेमन बिरादरीचे शकील टिक्की व अपनी गल्लीचे आताऊल्ला खान यांच्या स्वाक्षर्या आहेत.