TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात ‘उबाठा’ च्या राजकीय खेळीने राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ !

लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची रणनीती जातेय आखली ?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कारागृहात असतांनाही ज्या धरणगावातून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मताधिक्क्य मिळाले होते. त्याच धरणगावात लोकसभेच्या निमित्ताने उबाठा गटाकडून आखल्या जाणाऱ्या विधानसभेच्या रणनीतीने राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ झाला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यावरील नेत्यांच्या आदेशानेच धरणगावात राष्ट्रवादीसोबत ‘माइड गेम’ खेळला जात असल्याचेही बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट आणि भाजपकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. परंतू धरणगावात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धरणगावात प्रचार यंत्रणा राबविताना स्थानिक ‘उबाठा’ गटाकडून आघाडीतील महत्वपूर्ण पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत मोठी खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. प्रचारात गुलाबराव देवकर यांचे समर्थक पर्यायी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या व्यक्तींना मुद्दाम डावलून धरणगावात राष्ट्रवादीची ताकदच उरलेली नाही, असे चित्र रंगवले जात आहे. आतापासून राष्ट्रवादीला मानसिक आणि राजकीय दृष्ट्या कमकुवत केले तर विधानसभेच्या वेळी गुलाबराव देवकर यांच्या हाती ‘तुतारी’ ऐवजी ‘मशाल’ देण्याची रणनीतीवर काम सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असलेला चाळीसगाव मतदार संघ मशालकडे येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर चाळीसगावची जागा ठाकरे गटाला मिळणार असल्यामुळे जळगाव ग्रामीणची जागा राष्ट्रवादीकडेच राहील, यावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. परंतू ठाकरे गट मात्र, ही जागा आपल्याकडेच राहावी म्हणून प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची राजकीय रणनीतीवर काम सुरु असल्याची चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादीला प्रचारात दुय्यमस्थान देणे, देवकरांच्या समर्थकांना हेतुपुरस्कर डावलणे. थोडक्यात धरणगावातील राष्ट्रवादीचे अस्तित्वच नसल्याचे चित्र तयार करणे. जेणे करून विधानसभा लागल्यावार ठाकरे गटाला जळगाव ग्रामीणच्या जागेवर दावा करता येईल किंवा देवकरांना हाती मशाल घेण्यास भाग पाडता येईल. राष्ट्रवादीच्या तुलनेत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीचे झुकते माप देऊन एकप्रकारे देवकर गटाला डिवचले जात असल्याचीही भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

काही जण तर खाजगीत देवकरांनी हाती मशाल घेतली तर नौका पार होईल, अन्यथा काही खरे नाही असेही बोलत आहेत. त्यामुळे धरणगावसह जळगाव ग्रामीण मतदार संघात मतदारांमध्ये वेगळाच संदेश जात आहे. किंबहुना असे बोलून एक वेगळेच चित्र रंगवले जात आहे. उघड-उघड सुरु असलेल्या या खेळीमुळे देवकर गटाचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचीही भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अर्थात या विषयवार कुणी उघडपणे बोलत नसले तरी, राष्ट्रवादी शरद पवार गट अस्वस्थ असल्याची मात्र, जोरदार चर्चा  धरणगावात रंगली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेसाठी सुरु असलेल्या रणनीतीला राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे कशा पद्धतीने उत्तर देतात, हे तर आगामी काळातच स्पष्ट होईल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

*जुन्या जळगावातील बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडिओ कॉलवर तरुणीने एक एक करुन सगळे कपडे काढले अन् सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ !

January 4, 2022

गेल्या २४ तासात देशात आढळले ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण !

September 18, 2020

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलचा प्रणित जाणार इस्रो च्या सहलीला

February 1, 2021

मोठी बातमी : रोहित निकम यांची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली….!

March 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group