जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तर्फे कार्यालयात लोहपुरुष व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी आदरणीय गफ्फार मलिक साहेब, ( रा.कॉ. पार्टी अल्पसंख्याक) यांनी युवकांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी युवकांना त्यांच्या जिवन कार्या विषयी माहिती दिली. तसेच त्या प्रसंगी आदरणीय, अभिषेक पाटील (महानगराध्यक्ष रा.कॉ. पार्टी जळगाव), विकास पवार (जिल्हा समन्वयक रा.कॉ. पार्टी जळगाव), कल्पना पाटील (महिला जिल्हाध्यक्षा रा. कॉ. पार्टी जळगाव), प्रदीप (बंडु) भोळे ( महानगराध्यक्ष व्यापार व उद्योग आघाडी रा.कॉ. पार्टी जळगाव), आर. एस महाजन (जिल्हा अध्यक्ष सेवादल रा.कॉ. पार्टी जळगाव), आदरणीय, अरविंद मानकरी ( जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव), रोहण सोनवणे (जिल्हा अध्यक्ष रा.कॉ विद्यार्थी सं.जळगाव), अशोक लाडवंजारी मा.नगरसेवक, सुनिल माळी, आदरणीय चंदश कोल्हे, संजय चव्हाण, (कार्यालयीन चिटणीस) संजय पाटील, चंद्रकांत चौधरी, जयप्रकाश महाडिक, राजेशजी गोयर, जयश्री पाटील, गणेश भाऊ निंबाळकर , मनोज खरारे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.