जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘सर्व सामान्य माणसाच्या घरी चला’ अभियानातुन पक्ष सभासद नोंदणीचा संकल्प केला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग राज्य स्तस्तरीय पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी व तालुकाअध्यक्ष व तालुकास्तरीय पदाधिकारी शहरअध्यक्ष व शहर स्तरिय पदाधिकारी यांना कळवण्यात येते की, आपण पक्ष सभासद नोंदणी मोहीम अभियानात सहभागी होऊन किमान प्रत्येक पदाधिकारी यांनी किमान १००/११०सभासद करावे जेणे करुन आपला पक्ष व शरद पवार यांच्या फुले, शाहु, आंबेडकरी विचार सर्व घटकाला सोबत घेऊन जाण्याचा विचार, झोपडीतल्या शेवटच्या माणूस हा पक्षाला जोडला जाऊन त्यास सभासद करणे, हे धोरण आ.ना. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अँड जयदेव गायकवाड सामाजिक न्याय विभाग यांचा आदेशाने ‘सर्व सामान्य माणसाच्या घरी चला’ अभियानात सहभागी होऊन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने किमान ३००० सदस्य नोंदणीचा संकल्प केला असुन आपण पदाधिकारी तालुका स्तरावरुन सभासद पुस्तक न घेता जिल्हास्तरातुन आपल्या सामाजिक न्याय विभागाकडुन आपल्या तालुक्यात येऊन देणार आहोत. लवकरच तालुका निहाय दौरा ठरवुन तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व स्थानिक नेत्यांची वेळ घेऊन आपणास मीटिंगची तारीख कळवण्यात येईल. शरद पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त आपण घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल व पेपर कात्रण फोटोसह बैठकीत अहवाल सादर करावा, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी दिली आहे.