TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाची शहरात ‘मेगा स्वच्छता मोहीम’

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दि.२२ रोजी जळगाव शहरात मेगा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील ५ व्यापारी संकुलातून २ हजार किलो सिंगल युज प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री महापौर जयश्री महाजन होत्या. तर कार्यक्रमाला उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे पंकजकुमार नन्नवरे, उपायुक्त पवन पाटील, एनएसएसचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.दिनेश पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेनन, विनोद बियाणी उपस्थित होते. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

प्लास्टिक ऐवजी पर्यायांचा उपयोग करा : महापौर जयश्री महाजन

अध्यक्षीय भाषण करताना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, प्लास्टिक पर्यावरणाला घातक असून त्याचा नाश होत नाही. प्लास्टिक ऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रत्येकाने वापर करावा. आज जळगाव शहरातील व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी युवकांनी पुढाकार घेतला ही चांगली बाब आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक घडत आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या जल संवर्धन मोहिमेत देखील सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

तरुणांनी स्वच्छता दूत म्हणून पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, नेहरू युवा केंद्र जळगाव स्वयंसेवक यांच्यातर्फे जिल्हाभरात राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानाची प्रशंसा केली. तसेच युवकांनी स्वच्छता दूत म्हणून पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिक उपवास करण्यासाठी देखील जिल्हावासियांना आवाहन केले.

प्रत्येकाने प्लास्टिक उपवास पाळावा : नरेंद्र

प्रास्ताविक करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी, नेहरू युवा केंद्राची माहिती दिली. तसेच यावर्षी आजादी का अमृत महोत्सव, स्वच्छ भारत अभियानात जिल्हाभर घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देत अधिकाअधिक युवकांनी नेहरू युवा केंद्राशी जुळण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रत्येकाने सिंगल युज प्लास्टिकचा कटाक्षाने वापर टाळत प्लास्टिक उपवास पाळावा असेही नरेंद्र डागर म्हणाले.

पाच व्यापारी संकुलातून २ हजार किलो कचरा संकलित

सकाळी ७ वाजेपासून शहरातील महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट, जुने बी.जे.मार्केट, नवीन बी.जे.मार्केट, गोलाणी मार्केटमध्ये कोरोना नियमांचे पालन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. पाच व्यापारी संकुलातून १५० डस्टबीन बॅग भरून अंदाजे २ हजार किलो कचरा संकलित करण्यात आला. स्वच्छता अभियानाचा समारोप गोलाणी व्यापारी संकुलात करण्यात आला.

या संस्थांनी घेतला सहभाग

स्वच्छता अभियानात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव आकाशवाणी, रेडक्रॉस सोसायटी, सोशल लॅब, गोलाणी मार्केट सिंधी संगत आणि व्यापारी संघटना, मू.जे.महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, ऍड.एस.ए.बाहेती महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, राष्ट्रीय सेवा योजना, नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी गोलाणी मार्केट सिंधीसंगत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जवाहरलाल ललवाणी, सचिव महेश चावला, गिरधर ढाबी आदी उपस्थित होते.

स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

स्वच्छता अभियानासाठी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील, पल्लवी तायडे, दुर्गेश आंबेकर, मुकेश भालेराव, नेहा पवार, परेश पवार, राहुल जाधव, सागर नगाने, शंकर पगारे, दीपक खिरोडकर, मनोज पाटील, कोमल महाजन, हेतल पाटील, रवींद्र बोरसे, हिरालाल पाटील, उमेश पाटील, अनिल बाविस्कर, रोहन अवचारे, दिगंबर चौधरी या नेहरु युवा केंद्र तालुका स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. मोहिमेसाठी चाय शाय बारचे साहिल मनवाणी, दीपेश रुपानी आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन गिरीश पाटील, प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले तर आभार लेखाकार अजिंक्य गवळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

'आर्यन प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव' : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू !

December 16, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भोकर येथील दौरा पुढे ढकलला ; पालकमंत्र्यांनी दिली माहिती !

February 12, 2023

वाशिममध्ये एका तृतीयपंथीस विवस्त्र करून मारहाण

December 19, 2021

ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तणावाचे वातावरण

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group