जळगाव (वृत्तसंस्था) संपूर्ण जगात दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव विद्यालयात साजरा करण्यात आला. योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. योगा दिनाचा उपक्रम नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी माहेश्वरी विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून योगाबाबत जनजागृती करण्यात आली. योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. प्रसंगी अभिनव शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज तिवारी, मुख्याध्यापक हेमंत पाटील, नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमात ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
योगशिक्षक जितेंद्र कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देत आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. मुख्याध्यापिका सरोज तिवारी व हेमंत पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी समजून घेतले. उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक अश्विनी साळुंखे, ज्योती पाटील, संतोष सपकाळे, गुरु बारेला, भूषण पाठक, साधना कोल्हे, वैशाली पाटील, नयना मोरे, दीप्ती नारखेडे, प्रेमसिंग चव्हाण, साजन तडवी, उज्ज्वला पवार, शिल्पा रौतोळे, वर्षा गवळी, पंकज पाटील आदींनी सहभाग नोंदवित परिश्रम घेतले.