TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राची ७ जिल्ह्यांची युवा संसद उत्साहात ; विजयी स्पर्धक राज्यस्तरीयसाठी पात्र

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केला जाणारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव २०२१-२२ मार्चमध्ये होणार आहे. तत्पूर्वी ७ जिल्ह्यांचा जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम दि.२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने जळगावात घेण्यात आला. विजयी स्पर्धक राज्यस्तरीय युवा संसदेत सहभागी होतील.

जळगाव नेहरू युवा केंद्राचे कार्य लक्षात घेता यंदाचा राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्याचा मान जळगाव केंद्राला देण्यात आला आहे. दि.२५ फेब्रुवारी रोजी आयएमआर महाविद्यालयातून ऑनलाईन पद्धतीने युवा संसद स्पर्धा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी ७ जिल्ह्यांची ऑनलाईन युवा संसद मंगळवारी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ.सचिन नांद्रे यांनी युवा संसदचे उदघाटन केले. यावेळी परीक्षक म्हणून डॉ.उमेश गोगडीया, डॉ.सुधीर पाटील, हर्षल पाटील, प्रा.संदीपकुमार केदार, मनोज गोविंदवार यांनी काम पाहिले. तसेच लेखापाल अजिंक्य गवळी, स्वयंसेवक रोहन अवचारे, गौरव वैद्य, तुषार साळवे यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. आज जळगाव, परभणी, बुलढाणा, हिंगोली, अमरावती, वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी युवा संसद घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील १० स्पर्धकांना संधी देण्यात आली होती. त्यात स्पर्धकांनी इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या विषयावर ४ मिनिटात आपले वक्तृत्व सादर केले.

प्रत्येक जिल्ह्यातून २ विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात जळगाव – प्रथम सारांश धनंजय सोनार, द्वितीय सायली गणेश महाजन, हिंगोली -प्रथम वैष्णवी कैलास सातव, द्वितीय चेतन परमेश्वर साठे, अमरावती – प्रथम करण मधुसूदन पारेख, द्वितीय श्रेया मनीष शेळके, वाशिम – प्रथम सौरव महादेव घाडगे, द्वितीय युवराज रंगराव राठोड, परभणी प्रथम प्रतिभा प्रसाद मुरूबकर, द्वितीय पल्लवी मनोहर शिंदे, बुलढाणा – प्रथम सलोनी संजय त्रिवेदी, द्वितीय आसमाबी कलीम शहा, अकोला – प्रथम साक्षी दीपक पवार, द्वितीय आकाश पंजाबराव काळे यांचा समावेश आहे. विजयी स्पर्धक दि.२५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय युवा संसद घेण्यात येणार असून स्पर्धेत राज्यभरातील खासदार, आमदार देखील ऑनलाईन पध्दतीने सहभागी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
Next Post

भयंकर ! Porn दाखवून मामीनेच केलं भाच्याचं लैंगिक शोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026

कॉंग्रेसचे चंदन पाटील यांच्या दणक्यानंतर ‘तो’ दिशादर्शक फलक हटविला !

October 1, 2021

लष्करी जवानाने गरोदर पत्नीसह मुलीचा गळा आवळून केला खून !

September 14, 2023

प्रताप सरनाईक साधू संत नाहीत : नारायण राणे

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group