रांची (वृत्तसंस्था) एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby). या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आसामच्या कछार जिल्ह्यातीलही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे सर्वजण हैराण (Annoying) झाले आहेत.
माहितीनुसार, गंगा नगर गावांतील एका पाळीवर बकरीने अशा विचित्र पिल्लाला जन्म दिला. बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान आहेत. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता. सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं दिसतं. हे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासांनीच दगावल्याचं सांगितलं जातं आहे.