नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, संचालक गोविंदा भोळे, राजू पाटील, विनायक वाणी व मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्व प्रथम परिपाठ सादर करण्यात आला तदनंतर श्री गणेश व सरस्वती पूजन द्वारे कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. प्रवेशोत्सव मुख्य आकर्षण लहान मुलांचे सर्वात आवडते कार्टून मोटू – पतलू हे होते तर सर्व विद्यार्थांनी मोटू – पतलू सोबत बम बम भोले मस्ती मै डोले या गीतावर नृत्य केले. या कार्यक्रमात आज वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचे अनन्या साळी, मृणाली चव्हाण व आकाश माळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नंतर सर्व विद्यार्थ्यांना केक, चिप्स पॅकेट व चॉकलेट देण्यात आले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थांवर पुष्प वृष्टी करून वर्गात प्रवेश करण्यात आला. सर्वात शेवटी नर्सरी वर्गातील विद्यार्थ्यांकडून नवीन वर्गाचे उद्घाघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे नियोजन शितल चावरे, पूजा पाटील, संगीता जोशी व मंगला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले.