रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा २०६ बटालियनवर आयईडीन हल्ला केला. या माओवादी हल्ल्यात नाशिक जिल्ह्यातील नितीन भालेराव शहीद झाले आहे. त्यांच्यासह या हल्ल्यात नऊ जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कोब्रा बटालियन २०६ चे अधिकारी असलेले नितीन भालेराव हे जवानासोबत अभियानावरुन परतत असताना गंभीर जखमी झाले होते. राञी हेलीकॉप्टरने उपचारासाठी रायपुरला हलवले त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शहीद नितीन भालेराव गेल्यावर्षी पास आऊट होऊन कोब्रा बटालियनमध्ये दाखल झाले होते. बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते. रात्री परत येत असताना साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या अॅम्बुशमध्ये जवान फसले. यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात नऊ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल करणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीनं ८ गंभीर जखमी झालेल्या जवानांना रायपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे.
नितीन भालेराव हे मूळचे नाशिकचे आहेत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे नी भालेराव यांच्या कंपनी कमांडर शी संवाद साधला आहे सध्या भालेराव यांच्या मृतदेहांच पोस्टमार्टम सुरू आहे त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूर हून विमानाने मुंबईला आणल जाईल आणि तिथून ते नाशिकला आणण्यात येईल येईल त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल अशी माहिती मांढरे यांनी दिली.