TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ; सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचे एकमत

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुन्हा लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आणि त्यावर सर्वांचे एकमतही झाले. आता पुन्हा ३ सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक घेऊन अंतिम भूमिका निश्चित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या पेचाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एकूण आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली आहे. त्यात एससी, एसटींना आरक्षण देऊन उर्वरित आरक्षण ओबीसींना द्यावे. हे केल्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींना फारच कमी आरक्षण मिळेल त्या जिल्ह्यांबाबत नंतर वेगळा विचार करता येईल, असा या बैठकीतील सूर होता. सर्व सूचनांचा सरकार विचार करेल, विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवून पुन्हा बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा हा राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तीन महिन्यांच्या आत तयार करून राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ट्रिपल टेस्टद्वारे हे आरक्षण टिकवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मांडली. केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार आहे, तो केंद्राने तातडीने द्यावा आणि त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्यावे, अशी मागणी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ भुजबळ यांनी बैठकीत केली. त्यामुळे इम्पिरिकल डेटाबाबत आघाडी सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील मतभिन्नता कायम असल्याचे स्पष्ट झाले.

राज्यातील १०० नगर परिषदा व नगरपंचायतींची मुदत आधीच संपली असून, तेथे निवडणुकीची प्रतीक्षा आहे. येत्या नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २१० नगरपालिका व १० महापालिकांची मुदत संपणार आहे. मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. मुंबईसह अन्य महापालिकांची निवडणूकही पुढे ढकलली जाईल का, की येत्या तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करून निवडणुका घेतल्या जातील याबाबत उत्सुकता असेल.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही सर्वपक्षीय भावना आहे. बैठकीत आलेल्या सूचना, पर्यायांचा राज्य शासन अभ्यास करेल. सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहकार आणखी भ्रष्टाचार ; शिवराम पाटलांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल !

July 15, 2021

औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाची लागण !

September 22, 2020

जळगाव हादरलं : स्पा सेंटरच्या मालकाकडून महिलेवर बलात्कार ; तिघांविरुद्ध गुन्हा !

March 16, 2022

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group