चाळीसगाव (प्रतिनिधी) लेखापरीक्षणमध्ये २०१६ व १७ वर्षाचे दप्तर दाखवले नाही. चाळीसगाव जिल्हा परिषदच्या तत्कालीन उपविभागीय अभियंत्यासह ९ जणांना नोटीसा बजावल्या असून आर्थिक वर्षांची रक्कम वसूल निश्चित केल्याने जि.प.च्या बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा आमचा कार्यालयीन अंतर्गत विषय आहे. यात आपण हस्तक्षेप करू नका अशी प्रतिक्रिया चाळीसगाव जि.प. बांधकाम विभागाचे प्रभारी, उपविभागीय अभियंता किरण बरे यांनी दिली.
सन २०१६/२०१७ या वर्षात चाळीसगाव जि प बांधकाम विभाग अंतर्गत जी कामे झाली त्या कामांची एम बी रेकॉर्ड, कामांची बिले, नसत्या लेखापरीक्षणमध्ये तत्कालीन शाखा अभियंता एस एम शर्मा, एस टी मोरे, ए बी गडाख यांच्या सह ७ जणांनी सन २०१६/१७ च्या पंचायत राज समितीच्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल लेखापरीक्षण झाल्यावर मेमो रिडिंगमध्ये दप्तर दाखवले नाही. म्हणून त्यांना उपविभागीय अभियंता चाळीसगाव यांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यात म्हटले की, मुद्दा क्र १७४ कामाचे अभिलेखे पडताळणीस्तव उपलब्ध न झाल्याने सदर आर्थिक वर्षातील संपूर्ण रक्कम वसूलपात निश्चित केली आहे. सदर आक्षेपाची पूर्तता विभागीय स्तरावर होणाऱ्या मेमो रिडिंगमध्ये दप्तर दाखवून पुर्तता करणे शक्य होते. परंतु तसे न झाल्याने आजही दप्तर दाखवले नाही म्हणून मुद्दा प्रलंबित आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. तरी प्रस्तुत लेखात परीक्षण कामी दप्तर का दाखविण्यात आले नाही. याचा खुलासा मागवला आहे व ही प्रत कार्यकारी अभियंता जि. प जळगाव यांना पाठविण्यात आली आहे. सदर नोटीसा बाजावल्याने जि प बांधकाम विभागात खळबळ उडाली असून वरीष्ठ स्तरावर काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याबाबत चाळीसगाव विभागाचे उपविभागीय अभियंता किरण बरे यांचेशी संपर्क साधला असता हा आमचा कार्यालयीन अंतर्गत विषय आहे. यात आपण पत्रकार म्हणून हस्तक्षेप करू नका वरिष्ठ स्तरावरून व मी नोटीसा बजावल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या जि प बांधकाम विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. तालुकाभरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. काही कामे वेळेवर होत नाहीत तर काही कामे नित्कृष्ट दर्जाची होत आहेत. याची विचारणा अथवा माहिती घेण्यासाठी कोणी गेल्यास उपविभागीय अभियंता सरळ सांगतात आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही वर्क ऑर्डर इस्टीमेट ठेकेदार यांच्याकडे असतील अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. याकडे जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील गोरखपूर तांडा येथे सन २०१९/२० मध्ये आमदार निधीतून २ लाख ९६ हजार रुपयांचे पेव्हर ब्लॉक चे काम राम मंदिर समोर मंजूर होते व त्याच शेजारी १४ वा वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉकचे काम मंजूर होते. मात्र शाखा अभियंता ए बी गडाख व ठेकेदाराने काम न करता रक्कम काढून घेतल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी रयत सेनेचे गणेश पवार यांनी तक्रार केल्यावर या कामाची चौकशी एरंडोल येथील तत्कालीन अभियंता शेलार यांनी करून तसा अहवाल जि प बांधकाम विभागाकडे दिला होता. मात्र कोरोना व लॉकडाउनचा बहाणा करून तत्कालीन कार्यकारी अभियंता येवले यांनी याची माहिती पत्रकारांना दिली नाही, पण प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून शाखा अभियंता व ठेकेदाराने शेजारीच थातुरमातुर काम करून दिले आहे. याची चौकशी देखील जि प चे कार्यकारी अभियंता धिवरे व सी ओ बी एन पाटील यांनी करावी अशी मागणी होत आहे.