भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील अवैध गौण खनिज उत्खनन गट क्रमांक ९५ (ब) व ८५ या जागेत सुरू असल्याबाबतची तक्रार केदारनाथ वामन सानप यांनी दिल्यावरून जागा मालक कांताबाई बन्सीलाल बियाणी यांना मंडळ अधिकारी कु-हे पानाचे भाग भुसावळ यांच्या कार्यालयाकडून दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार केदारनाथ वामन सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडळ अधिकारी कु-हे पानाचे भाग भुसावळ यांच्या कार्यालयाकडून अवैध गौण खनिज उत्खनन गट क्रमांक ९५ (ब) व ८५ या मधून होत असल्याची तक्रारीची दखल मंडळ अधिकारी यांनी घेतली असून दि. ५ मे २०२१ रोजी कांतीलाल बंशीलाल बियाणी जागा मालक यांना चौकशीकामी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
















