अकोला (वृत्तसंस्था) शहरातील न्यू तापडिया नगरमधील निर्माणाधीन पुलाजवळ कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोनू काकड असे मयताचे नाव असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मोनू काकडवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मोनू काकडेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतक मोनू काकडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पूर्ववैमनस्यातून ही त्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हत्या का करण्यात आली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाहीय.
















