जळगाव (प्रतिनिधी) “लहान पण कसं गेलं कळलं नाही, तारूण्य शिक्षणात गेलं नंतर नोकरी, लग्न, संसार स्थिर करण्यात आयुष्य गेलं आता कुठे सेवानिवृत्त झाल्यावर जीवन जगण्याची खरी सुरुवात झाली. त्यामुळे वासुदेव जेष्ठ नागरिक संघ हा आनंदाची खाण आहे,” असे प्रतिपादन संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आज केले.
शहरातील रिंग रोडवरील रामकृष्ण योग केंद्रामध्ये वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष धनराज पाटील उपाध्यक्ष प्रभाकर झांबरे, सचिव विश्वनाथ वाणी, तसेच नवीन निर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील, सतीश जंगले ,भानुदास पाटील,संयोजक डॉ. नितु पाटील हे उपस्थित होते.
पुढे उल्हास पाटील म्हणाले की, उतार वयामध्ये नातवंडे सोबत विरंगुळा होतोच पण स्वतःचं उरलेले जीवन हे स्वतःहा जगण्यासाठी, आपले आनंद, छंद जोपासण्यासाठी असे ज्येष्ठ नागरिक संघ निश्चितच उपयोगी पडतात. डॉ.नितु पाटील यांना मी तब्बल सोळा वर्षापासून ओळखत असून त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची मला जाणीव आहे. वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांनी केलेले जेष्ठ नागरिकांचा संघटन हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आरोग्य, अध्यात्म आत्मज्ञान ते आनंद या चतुरसूत्रीवर संघ उभा असून हे चार स्तंभ निश्चितच तुम्हाला जगण्याची नवीन दिशा देणारे आहेत.
“ज्येष्ठ नागरीक भूषण पुरस्कार”
संघातील ज्या सभासदांनी वयाची ऐशी वर्ष पार केले त्यांना “ज्येष्ठ भूषण पुरस्कार” या सन्मानाने डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, गुलाब पुष्प देत सन्मानित करण्यात आले. रमण शंकर भोगे, श्रीमती इंदुबाई चावदस सपकाळे, प्रभाकर उखर्डू झांबरे, मधुकर नामदेव बेंडाळे, सुरेश वामन नेहेते, सुरेश बेलसरे, रमेश चौधरी यांचा यात सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता टोके यांनी वर्धापनदिन निमित्ताने स्वरचित कविता सादर करत वाह वाह मिळवली.
“विशेष सत्कार”
श्रीमद् भगवद्गीता गीताचे अठरा पैकी बारा पाठ कंठस्थ केल्याबद्दल गीत परिवारतर्फे नूतन अध्यक्ष प्रकाश पाटील यांना ‘गीता पथिक” प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
“सामाजिक समरसता 2026 चे दिनदर्शिका वाटप”
सामाजिक समरसता , नवचैतन्याचा शंखनाद या संकल्पना नुसार गुडीपाडवा निमित्ताने ना.संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तयार केलेले दिनदर्शिका वाटप सर्व सभासदांना करण्यात आले. यावेळी जुन्या कार्यकारणीला निरोप देण्यात आला व नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष धनराज पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले, प्रस्तावना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील,तर डॉ. नितु पाटील,मागील 10 वर्षाचा आढावा सादर करत आगामी वर्षाच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
यावेळी रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, दिलीपसिंग चौधरी ,जनार्धन राणे, ,पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले ,विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे , लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते ,विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील ,रमेश पाटील,दिवाकर गुळवे, रूपचंद्र पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील , ज्ञानेश्वर पाटील ,इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे ,रजनी तळेले ,यशवंत वारके ,विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे ,पाटील ,अरुण धांडे आदी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे,भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केलेयशस्वी तेसाठीण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.आभार प्रदर्शन भानुदास पाटील यांनी मांडले. कार्यक्रमानंतर उत्तम असा जेवणाचा आस्वाद घेण्यात आला.तरुणांना लाजवेल असा उत्साह..
मी आतापर्यंत भरपूर जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे,पण वासुदेव जेष्ठ नागरिक संघ हा काटेकोरपणे वेळेचं बंधन पाळणारा असून प्रत्येक सभासदाचा उत्स्फूर्तपणे येणारा प्रतिसाद हा निश्चितच पणे तरुणांना लाजवेल असा आहे.
डॉ. उल्हास पाटील,अध्यक्ष, गोदावरी फौंडेशन
चौकट 2
एक तरी ओवी मी,डॉ. नितु पाटील
वासुदेव जेष्ठ नागरिक संघ दरवर्षी एक थीम ठरवून त्यावर वर्षभर कार्यक्रम राबवते. यावर्षी “एक तरी ओवी अनुभवावी” या अंतर्गत धार्मिक सहल,प्रवचन,निरूपण, कीर्तन,भारुड असे विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत .
डॉ.नितु पाटील, संयोजक वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ.

















