धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज मोठा माळी वाडा समाज मढी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धरणगाव तालुक्याच्यावतीने “ओबीसी आरक्षण पे चर्चा”या विषयावर मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, विभागीय संघटक अनिल नळे, निरीक्षक नितीन शेलार, विधीज्ञ ऍड. प्रतिक कर्डक, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक रवी सोनवणे, जिल्हा सरचिटणीस वसंत पाटील हे उपस्थित होते.
यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी पक्षभेद जातीभेद विसरून ओबीसी व बहुजन म्हणुन आपण एकत्र आले पाहिजे, व एक मोठा लढा उभा केला पाहिजे, जेणेकरून राजकीय आरक्षण प्रमाणेच शैक्षणिक आरक्षण नोकरीतले आरक्षण रद्द होऊ नये म्हणून आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर ओबीसी आरक्षण लढा तीव्र केला पाहिजे आणि यासाठी सर्वच ओबीसींनी तयार झाले पाहिजे, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोठी चळवळ उभी करावी लागेल व त्यासाठी सर्व ओबीसी संघटना व बहुजन समाज संघटना यांची साथ भुजबळ यांच्या पाठीमागे असली तर निश्चितपणाने आपण हा लढा जिंकू शकतो असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष ऍड संजय महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मुस्लिम नेते नगर मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, चौधरी समाज अध्यक्ष सुनील चौधरी, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, तालुका अध्यक्ष धनराज माळी समाज उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण पे चर्चा या मेळाव्यासाठी तालुक्यातून व धरणगाव शहरातून विविध ओबीसी समाजाचे प्रमुख व पदाधिकारी नगरसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नगरसेवक भागवत चौधरी, विजय महाजन, युवा क्रांती मंच अध्यक्ष आर. डी. महाजन, समाजाचे सचिव दशरथ महाजन, भाजपा अध्यक्ष दिलीप महाजन, भावसार समाज अध्यक्ष चंद्रकांत भावसार, धोबी समाज कार्यकर्ते विनोद रोकडे, अँड वसंत भोलाणे, अँड शरद माळी, वाणी समाज प्रमुख चंद्रशेखर वाणी, भास्कर मराठे, डिगंबर महाजन, राजेंद्र महाजन, विनायक महाजन, गोरख देशमुख, कांतीलाल महाजन, कैलास महाजन विवरे गावातून सुभाष महाजन, दिलीप महाजन, किरण देशमुख मोठया प्रमाणावर ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले सूत्रसंचालन व्ही. टी. माळी यांनी केले तर आभार गोपाल महाजन यांनी मानले.