धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पथराड येथे शेतात जाण्याच्या रस्त्यात अडथळे निर्माण केले म्हणून चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, पांडुरंग दामु बाविस्कर (वय ५९, धंदा शेती रा. शिव कॉलनी, जळगाव) पथराड गावी शेत आहे. २४ जानेवारी पूर्वी (वेळ नक्की नाही). गट नं. ८९ मधील वहीवाट रस्ता खोदुन अनिल बन्सिलाल सोमाणी, सुदर्शन अनिल सोमाणी (दोन्ही रा.पाळधी बु ता.धरणगाव), जितेन्द्र पन्नालाल जोशी (रा. अश्विनी मेडीकल भास्करमार्केट जवळ जळगाव, प्रविण यशवंत निकुंभ (रा. पथराड ता.धरणगाव) यांनी बाविस्कर यांना शेताच्या रस्ता वापरास अडथळा निर्माण केला. या प्रकरणी २५ एप्रिल रोजी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस अधिक्षक रावले हे करीत आहेत.