जळगाव (प्रतिनिधी) धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकल्यामुळे जळगावात एका तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा व्हीडिओ गुरूवारी मध्यरात्री काही तरूणांच्या व्हॉट्सॲपवर आला होता. त्यानंतर त्यांनी शनिवारी संबंधित प्रकाराबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरूध्द धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.