TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यधोरणाच्या खासगीकरणाचा केजरीवालांचा मानस, गुन्हेगारी षड्यंत्रातही लिप्त : सीबीआय !

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in गुन्हे, राज्य, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वादग्रस्त मद्यधोरण व त्याच्या अंमलबजावणी संबंधित गुन्हेगारी षड्यंत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रारंभीपासूनच सामील होते, असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘केंद्रीय अन्वेषण ब्युरो’ अर्थात ‘सीबीआय’ने आपल्या पुरवणी आरोपपत्रात शनिवारी केला. मद्य धोरणाचे खासगीकरण करण्याचा केजरीवालांचा मानस होता. म्हणूनच त्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या सहकाऱ्यांना वसुलीचे काम दिले. या मद्यधोरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते रद्द केल्याचा आरोप सीबीआयने केला.

दिल्ली सरकारच्या मद्यधोरण प्रकरणी सीबीआयने पाचवे व अंतिम आरोपपत्र दाखल करीत आपला तपास पूर्ण केला. सीबीआयने आपले अंतिम आरोपपत्र दिल्लीतील राऊज एवेन्यू न्यायालयात दाखल केले. यात, सीबीआयने अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट मद्यधोरण ठरवत होता. तेव्हा केजरीवाल यांनी मार्च २०२१ मध्ये स्वतःच्या आम आदमी पक्षासाठी (आप) आर्थिक मदत मागितली. सिसोदिया या प्रकरणात सहआरोपी आहेत. केजरीवालांचे व्यापारी सहकारी तथा आपचे मीडियाप्रमुख विजय नायर हे मद्य व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधत होते.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

नायर यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांच्या अध्यक्षतेखालील ‘साऊथ ग्रुप’च्या आरोपींशी संवाद साधण्याचे काम केले. आपल्यासाठी अनुकूल धोरण बनवण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून १०० कोटींची ते लाच मागत होते. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हे मनमानी धोरण लागू करणे व त्यास मंजुरी देण्याच्या भूमिकेत होते, असा दावा सीबीआयने केला. ‘आप’च्या तिकिटावर २०२२ मध्ये गोवा विधानसभा निवडणूक लढणाऱ्या राज्याचे दोन माजी आमदारांनी आम आदमी पक्षाला पैसा दिल्याची कबुली दिली आहे.

मद्यधोरण आपल्या बाजूने करण्यासाठी ‘साऊथ ग्रुप’ने दिलेल्या ९० ते १०० कोटी रुपयांपैकी ४४.५ कोटी रोख स्वरूपात गोवा निवडणुकीवर खर्च केल्याचा उल्लेख सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे. दरम्यान, सीबीआयने केलेल्या आरोपांचे आम आदमी पक्षाने खंडन केले आहे. अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. या ठिकाणी ते अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्याप्रकरणी अटकेत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

मनूर बु।। सहकारी दूध संस्थेला उत्कृष्ट कामकाजात तालुक्यात प्रथम क्रमांक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : जळगावच्या मुख्य कार्यालयातून नगर सीआयडीने घेतला सावेडी शाखेचा डेटा !

November 16, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 जुलै 2025 !

July 26, 2025

पुलावरून कुझर नदीपात्रात कोसळली ; दोघांना जलसमाधी !

May 11, 2024

‘बायकोने मटण बनवलं नाही’, नवऱ्याची १०० नंबरवर तक्रार ; मग पोलिसांनी….!

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group