जळगाव (प्रतिनिधी ) : दहा वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या सौरभ वासुदेव खर्डीकर (वय २६, रा. राधाकृष्णनगर) याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस. महाजन यांनी शनिवारी हा निकाल दिला. अॅट्रॉसिटी कायद्याखालीदेखील त्याला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील सार्वजनिक शौचालयात १० जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता. तत्कालीन सहायक अधीक्षक डॉ. निलाभ रोहन व सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी एकूण १६ साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलगी, आरोपीचे रेखाचित्र काढणारे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी, तसेच आरोपी पीडितेला घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज आदी महत्त्वाचे पुरावे ठरले. अॅड. बोरसे यांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने बलात्कार व पोक्सो अंतर्गत मरेपर्यंत जन्मठेप, अॅट्रॉसिटी कायद्याखाली त्याला २० वर्षे कारावास व ७० हजार रुपये दंडाची शिक्षा मनातली