धरणगाव (प्रतिनिधी) आज ७५ व्या महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, विश्वकल्याण भवन, एरंडोल रोड, धरणगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पत्नी सौ. हिरे यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात येवून शिवलिंगाची सपत्नीक पूजा करण्यात आली.
प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली. सरिता, कल्याणी यांनी अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. प्रसंगी महाशिवरात्रीचे महत्व नीता यांनी सांगितले. तसेच अध्यात्मिक महत्व आणि मेडीटेशनची आजच्या काळात सर्वाना गरज असल्याचे प्रतिपादन जयपाल हिरे यांनी केले. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शासनाचे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळण्यात आले. यावेळी रामकृष्ण महाजन, वाघळूद येथील ओम कॉटनचे संचालक रवींद्र पाटील, लिटील ब्लॉसम इग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका ज्योती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.