पाटना (वृत्तसंस्था) पटनाजवळील दानापूरचा राहणारा एक विमा एजंट तरूणीचा शिकार झाला आहे. विमा एजंटला फोनवर एक व्हिडीओ कॉल आला. तरूणाने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला. दुसऱ्या स्क्रीनवर एक तरूणी होती. काही वेळातच तिने एक एक करून तिने अंगावरील सगळे कपडे काढले आणि ती निर्वस्त्र झाली. हा व्हिडीओ कॉल तिने रेकॉर्ड केला. नंतर तरूणाने व्हिडीओ कॉल कट केला. पण तिथूनच त्याच्या ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला.
त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याला एका तरूणीने कॉल केला होता. आणि सांगितलं की, तिच्या परिवाराला हेल्थ आणि टर्म इन्श्यूरन्स प्लान घ्यायचा आहे. नंतर तरूणीने आपल्या परिवाराचे डिटेल्स पाठवण्यासाठी एजंटचा व्हॉट्सअप नंबर घेतला. तरूणानेही लगेच नंबर दिला. नंतर त्या तरुणीने तरुणाला व्हिडीओ कॉल केला. कॉल रिसीव केल्यावर तरूणीने एक एक करून अंगावरील सगळे कपडे काढले. त्यानंतर तरूणी विमा एजंटसोबत अश्लील भाषेत बोलू लागली होती. थोड्या वेळाने तरुणाने कॉल कट केला. त्याला जराही अंदाज नव्हता की, तरूणी त्याच्यासोबत काय करणार आहे.
विमा एजंटकडे ५० हजार रूपयांची मागणी
कॉल कट केल्यावर काही वेळाने विमा एजंट तरूणाला मोबाइलवर व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉट्सचे अनेक फोटो आले. ज्यात तरूणी नग्न अवस्थेत विमा एजंटसोबत बोलत आहे. स्क्रीनशॉटचे अनेक छोटे व्हिडीओ पाहिल्यावर तरूणाला धक्का बसला. थोड्यावेळाने तरुणीने विमा एजंटकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. मात्र, विमा एजंटने पैसे देण्यास नकार दिला. तरूणीने पुन्हा त्याला फोन केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकमी दिली. विमा एजंटने नकार दिल्यावर तरूणीने सहकारी क्राइम ऑफिसर आणि अधिकारी बनून तरूणाला फोन करू लागले होते. त्यांनीही तरुणाला धमकी दिली. त्यांनीही तरूणाकडे पैशांची मागणी केली.
तरुणीने विमा एजंटला आपला अकाऊंट नंबर पाठवला
फोन करणाऱ्याने विमा एजंटला सांगितलं की, त्याने दिल्लीतील सायबर सेलमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याने लवकरात लवकर तरूणीसोबत सेटलमेंट करून घ्यावी. नाही तर दिल्ली पोलीस येऊन तुला अटक करतील. तरीही विमा एजंटने काही ऐकलं नाही. त्यानंतर तरुणीने विमा एजंटला आपला अकाऊंट नंबर पाठवला. लगेच पैसे टाकण्यास सांगितलं. त्यानंतरही तरूणी आणि तिच्या गॅगच्या लोकांनी तरुणाला अनेकदा फोन केले. पण तरूण काही पैसे द्यायला तयार नव्हता. कंटाळून तरूणाने पटना सायबर सेलमध्ये तरुणी आणि तिच्या गैंग विरोधात तक्रार दाखल केली. आता पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत.
















