जळगाव (प्रतिनिधी) लाचप्रकरणी गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे व कत्राटी शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम सैंदाणे या दोघांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली. अटक केल्यानंतर मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत शाळेस अनुदान मिळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गट शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे व कत्राटी शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम सैंदाणे या दोघांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली. या दोघांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड. भारती खडसे यांनी काम पाहिले.