चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वैजापूर गावाच्या हद्दीत खाऱ्यापाडाव ते वैजापूर रोडवर ३ देशी गावठी कट्टे आणि १० जिवंत काडतुसासह एकाला अटक करण्यात आली आहे. राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (रा. पारउमटी जि. बडवाणी), असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ रोजी ४.४५ वाजेच्या सुमारास वैजापूर गावचे हद्दीत खाऱ्यापाडाव ते वैजापूर रोडवर राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे प्रत्येकी ३० हजार किमतींचे तीन गावठी कट्टे (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचे, त्यास काळ्या रंगाची मुठ, त्यावर लाला रंगाचे स्टारचे चिन्ह असलेल्या मॅगझिन्ससह व १० हजार किमतीचे पिवळ्या धातूचे १० काडतुसं मिळून आले. त्याच्याकडून असा एकुण १ लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.