धरणगाव (प्रतिनिधी) आजोबांच्या नांवावर असलेल्या शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून एकाला लाकडी बांबूने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शालिक ताथू गजरे, अरुण शालिक गजरे, विकास शालिक गजरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जखमी दत्तू शांताराम गजरे (वय ३२, रा. बाभळे ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ मार्च २०२२ रोजी बाभळे गावात सार्वजनिक जागी शालिक ताथू गजरे, अरुण शालिक गजरे, विकास शालिक गजरे (सर्व रा. बाभळे ता. धरणगाव) यांनी फिर्यादीच्या आजोबांच्या नांवावर असलेल्या शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून शिविगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली व अरुण गजरे याने त्याच्या हातातील लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली आहे. तसेच अरूण गजरे यांनी फिर्यादीची आई इंदूबाई यांना देखील धरणगाव पोलीस स्टेशनला येत असतांना धरणगाव शहरात मच्छी मार्केट जवळ हाताबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शालिक ताथू गजरे, अरुण शालिक गजरे, विकास शालिक गजरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ईश्वर शिंदे करीत आहेत.