जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी विरोधात केलेले कायदे त्वरित रद्द करा या मागणीसाठी शेतकरी दिल्ली येथे एकोणावीस दिवसापासून आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्हा अखिल भारतीय किसान संघर्ष समिती जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सकाळी अकरा ते पाच एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात जळगाव शहरातील विविध संघटना विविध संस्था राजकीय पक्ष यांचा समावेश होता
आंदोलनात यांची होती उपस्थितीत
महाराष्ट्र राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष गफ्फार मलिक, लोक संघर्षचे सचिन धांडे, आंबेडकरवादी समितीचे मुकुंद सपकाळे, मराठा महासंघाचे सुरेंद्र पाटील व सुरेश पाटील, लेवा पाटीदार समाजाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार, ह्यूमन फाऊंडेशनचे रिझवान जागीरदार, काँग्रेस चे मुक्ती हारून, नगरसेवक शिवसेनेचे प्रशांत नाईक, सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, बीएड कॉलेजच्या प्राध्यापिका रेखा देवकर प्राध्यापक अंजली कुलकर्णी, प्राध्यापक शबाना खाटीक, प्राध्यापिका कहेकशा अंजुम, प्रा. प्रीतीलाल पवार, छावा प्रमोद पाटील, लोकसंघर्ष मोर्चा भरत कर्डीले, किरण वाघ, अयाझ अली, श्रीकांत मोरे, सैयद रेहान, किसान सभा रामधन पाटील, खुशाल चौहान, नाना महाले, अलीखालील बागवान, चंदन ईश्वर नवगिरे, प्राध्यापक राम पवार आदी उपस्थित होते.