धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील हॉटेल सूर्या जवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल काण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी पितांबर बं प्रधान (वय ६६) हे त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.MH-१९-AA-०९५४ हिच्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ हॉटेल सूर्या जवळुन जात असतांना त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रवी पितांबर प्रधान (वय ४०, रा. सावदे प्र.चा. ता एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल काण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ करीत आहेत.