TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादातून एकाचा खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह !

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांकडून गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने गुन्हा उघड ; औरंगाबादच्या दोघं संशयिताना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) अवघे पाच हजार रूपये परत देण्याच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह दरीत फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी औरंगाबादच्या दोघांना अटक केली आहे. मधुकर रामदास बुटाले (वय ४५, रा. न्यायनगर, पुंडलिक नगर, औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, २९ ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताचा चेहरा कुजलेला असल्याने ओळख पटत नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक हर्षा जाधव यांनी मृताच्या चेहऱ्याचा फोटो काढून तो फोटोग्राफरकडून डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट करून घेतला. त्यानंतर मृताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटवली. याच पुराव्याच्या आधारे चाळीसगाव पोलिसांनी ३० सप्टेंबरला मृताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत (वय ३२) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले (वय २५, दोन्ही रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले.

READ ALSO

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

खाक्या दाखवताचे गुन्हा केला कबूल
पोलीस चौकशीत समोर आले की, मयताचे नातेवाईक घात-पात असल्याचा संशय व्यक्त करत होते. मयताच्या मारेकरीचा कोणताही मागमूस नसतांनाही चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली व गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने दिनांक ३० रोजी सदर मयताचे मारेकरी शोधून त्यांना ताब्यात घेतले. सदर मयताचे मारेकरी हे मयताचा मेहूणा संशयित आरोपी गोपाल शंकर पंडीत (वय-३२) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले )वय- २५, दोन्ही रा. औरंगाबाद) हे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
या दोघांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलविले. सुरवातील गोपाल पंडीत याने मयताची मुलगी धुळे येथे दिलेली असल्याने कदाचित तो औरंगाबाद येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाला असावा व कन्नड घाटात उतरून दारुच्या नशेत घाटात पडला असावा, अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.

रिक्षातच गळा दाबून केला खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह
दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी वरील दोन्ही संशयित आरोपी हे मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडीत याची रिक्षा (क्र. एमएच 20 ईएफ-7984) हिचेत बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना ५ हजार रुपये देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांचे चिखलठाणा पोस्टे हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भाडण झाले. यानंतर कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले याचा गळा दाबून खून केला व तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून त्याचे प्रेत रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्टजवळ दरीत फेकून दिले. सध्या दोन्ही आरोपी हे चाळीसगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचेविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केला गुन्ह्याची उकल 
सदर गुन्ह्याचा तपास जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय टेंगे, सहा. पोलीस निरीक्षक हर्षा जाधव, पोहेकॉ युवराज नाईक, पोना . शांताराम पवार, सफौ राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पोना शंकर जंजाळे, पोना संदिप माने, पोना मनोज पाटील, पोना प्रेमसिंग राठोड, चालक सफी / अनिल आगोणे अशांनी यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chalisgaon murderjalgaon police

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
गुन्हे

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025
गुन्हे

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025
गुन्हे

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025
Next Post

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ,(फेडरेशन)चे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 10 ऑक्टोबरला धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे‘ऊर्जा’ चॅट बॉट २४ तास उपलब्ध !

May 9, 2024

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज : आरिफ शेख

March 22, 2022

शाळा सोडण्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश ; शिक्षण विभागाचा निर्णय

June 18, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 मार्च 2024 !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group