धरणगाव (प्रतिनिधी) येथील बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने तीन दिवस विविध गणित स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काशिनाथ ओंकार मिस्तरी उपस्थित होते. जीवन जगताना क्षणोक्षणी गणिताची कास धरावी असं काशिनाथ मिस्तरी यावेळी म्हणाले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक कैलास महाजन, जगन्नाथ महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम. एच.चौधरी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गणित शिक्षक ए. के.पाटील यांनी भेट दिलेल्या श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील गणित विषय शिक्षिक ए के पाटील यांनी रामानुजन यांचा जीवन संघर्ष सांगितला. त्यांच्या भौमितिक रचना, प्रमेय आणि गणितावर असणारे नित्तांत प्रेम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित दिवसाचे औचित्य साधून गणित चित्रे, गणित रांगोळी, आकृतीबंध, गणित कोडी, गणित गाणी, वक्तृत्व स्पर्धा ई. आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांनी दिलेल्या रोख रकमेतून बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ११८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
परीक्षक म्हणून शाळेतील एम.एच.चौधरी, बी. आर.महाजन, आर. बी. महाले, के.आर.महाजन, ए. ए.पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षक ए. के.पाटील तर आभार बी आर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदांसोबत इतर कर्मचारी किरण महाजन, बी. डी.सुतार, पी.एन.माळी यांनी सहकार्य केले.
















