धरणगाव (प्रतिनिधी) धनादेश अनादर प्रकरणी एकाला धरणगाव न्यायालयाने सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भात अधिक असे की, भाऊसाहेब श्रावण पाटील यांचे सागर कृषी केंद्र या नावाने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, रासायनिक औषधी, जैविक औषधी व खते यांचा खाऊक व किरकोळ विक्रीचा व्यवसाय ठिकाण दुकान नं.४ व ६,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स, सोनवद रोड, धरणगाव येथे आहे. तर महेंद्र गोविंदराव चव्हाण यांचा शेती व्यवसाय होता. तसेच चव्हाण यांना शेतीसाठी लागणारे बी. बियाणे रासायनिक औषधी, जैविक औषधी व खते हे दुकानातून नियमितपणे घेत होता. अगदी चव्हाण हे नियमित ग्राहक होते.
महेंद्र गोविंदराव चव्हाण यांनी भाऊसाहेब पाटील यांच्या दुकानातून दिनांक ०९/०६/२०१२ ते दिनांक ०२/१२/२०१६ पर्यंत एकूण रक्कम रुपये २,७१,८२०/- एवढ्या रकमेचे खते, बियाणे व औषधी वेळोवेळी उधारीने खरेदी केले होते. त्या एकूण रकमेपैकी महेंद्र चव्हाण यांनी वेळोवेळी एकूण रक्कम रुपये ५३,८८०/- अशी वसूली दुकानावर येऊन जमा केलेली आहे. एकूण रकमेपैकी महेंद्र चव्हाण यांच्याकडे वसूल वजा जाता रक्कम रुपये २,१८,१४०/- मात्र घेणे बाकी होती. महेंद्र चव्हाण यांच्याकडे वेळोवेळी सदर बाकी रकमेची मागणी तक्रारदार यांनी केली होती. त्यानंतर भाऊसाहेब पाटील यांना महेंद्र चव्हाण यांनी चेक देत सांगितले की, सदर चेक तुम्ही बँकेत वटविण्यासाठी टाका, तुम्हाला चेकमध्ये नमूद रक्कम निश्चित मिळेल.
त्यानंतर चेक बँकेत वटवीणेसाठी टाकला असता सदरचा चेक दिनांक १०/०८/२०१७ रोजी न वटताच बँकेच्या मेमोरंडम सह परत आला व त्यात चेक न वटण्याचे कारण Funds Insufficient ” असे नमूद होते. त्यामुळे भाऊसाहेब पाटील यांनी महेंद्र चव्हाण यांना सदर बाब सांगितली असता चव्हाण यांनी सांगितले कि, मी लवकरात लवकर पैश्यांची व्यवस्था करून तुम्हाला रोख पैसे तुमच्या दुकानावर आणून देईल. “त्यावेळी सांगण्यावर विश्वास ठेवला व नोटीस पाठविली नाही. दिलेला चेक हा महेंद्र चव्हाण यांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे तसेच त्याची माहिती व जाणीव असतांना सुद्धा हेतुपुरस्करपणे चेक दिला व सदर चेक देतेवेळी त्या चेकचा अनादर होईल व चेकमध्ये नमूद रक्कम फिर्यादीस मिळेल, अशी खोटी माहिती देवून भाऊसाहेब पाटील यांची फसवणूक व विश्वासघात केला.
याप्रकरणी न्यायालयाने सुनावणीअंती गोविंद माधवराव चव्हाण यांना सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा आज सुनावली. फिर्यादीपक्षातर्फे ऍड. मनोज दवे यांनी तर बचावपक्षातर्फे सी.झेङ कट्टयारे यांनी काम पाहीले. बचाव पक्षातर्फे एकूण 38 न्यायनिवाडे देवून सुध्दा शिक्षा सुनावण्यात आली हे विशेष ! न्यायाधीश एस.ङी.सावरकर यांनी हा निकाल दिला आहे.