धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरातील एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने घराबाहेरून लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, संजय नगरमधील रहिवाशी अनिल चावदस माळी (वय ४३) यांनी २० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर नेहमीप्रमाणे दुचाकी लावली होती. परंतू २१ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचे अनिल माळी यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतु मिळून आली नाही. त्यामुळे अखेर २८ जून रोजी श्री. माळी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.