जळगाव (प्रतिनिधी) विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ऑनलाइन डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची थीम घेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बालगीत, दुसरीसाठी प्राणी गीत, तिसरी साठी ऋतू वर आधारित गीत, चौथीसाठी फोक डांस व पाचवीसाठी विविध उत्सव वर आधारित नृत्य देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचे प्राचार्यां अमित सिंह भाटिया समन्वयक स्वाती अहिरराव होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला भादूपोता, अर्चना पाटील, शिल्पा मांडे, प्रदीप पाटील, धीरज जावडे यांनी केले तर परीक्षक म्हणून भारती माळी, मंजुषा भिडे, स्वाती देशमुख, स्वाती अहिरराव हे होते. तर या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
इयत्ता पहिलीमध्ये प्रथम समीक्षा पाठक, द्वितीय भौतिक बारी, तृतीय जिग्नेश खैरनार
इयत्ता दुसरी मधून प्रथम खुशी वाणी द्वितीय भार्गवी पाटील, तृतीय भार्गवी चव्हाण
इयत्ता तिसरी प्रथम विधी किनगे द्वितीय विधी झवर तृतीय खुशी भारंबे, भूमिका मालपाणी
इयत्ता चौथी प्रथम सन्मेश ठाकूर, लुब्धा नारखेडे द्वितीय निराली पाटील तृतीय उत्कर्ष चव्हाण ओजस्विनी तायडे
इयत्ता पाचवी मधून प्रथम सानिका भोळे द्वितीय वैभवी पाटील तृतीय अस्मि पोकळे
या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन निलेश बडगुजर, समाधान पाटील ,प्रदीप पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.