जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०२, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०३, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ८२६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १८ रुग्ण सध्या उपचार घेताय.