TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पांडुरंग नगरातील ‘ओपन स्पेस’ नागरिकांसाठीच राखीव राहणार! उपमहापौर सुनील खडकेनी दिले आश्वासन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील पांडुरंग नगरात असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग कुणीतरी इतर सामाजिक संस्थाचालक करणार असल्याची माहिती नागरिकांनी उपमहापौर सुनील खडके यांना दिली. परिसरातील नागरिकांच्या संमती शिवाय कुणीही जागा ताब्यात घेऊ शकत नाही. परिसरातील नागरिकांसाठी असलेली जागा त्यांच्यासाठीच राखीव राहील असे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांना दिले.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ९ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, मयूर कापसे, विजय पाटील, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, मनोज काळे, गजानन देशमुख आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते. मुक्ताईनगर आणि निवृत्ती नगरात अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नळ जोडण्या देणे अद्याप बाकी आहे. नागरिकांनी याबाबत तक्रार केल्याने उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता पुढील आठ दिवसात सर्व जोडण्या पूर्ण करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बजरंग बोगद्यापासून एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच्या गटारीचे काम अनेक महिन्यापासून रखडले असून कामाची प्रत्यक्षात पाहणी करून ते मक्तेदाराकडून लवकरात पूर्ण करून घेण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. हनुमान मंदिरासमोरील उद्यानात देखरेखीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत देखील महापौरांनी सांगितले. निवृत्तीनगरात नियमित साफसफाई होत नसल्याची समस्या देखील नागरिकांनी मांडली.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

पांडुरंग नगरात रस्ते सपाटीकरण, साफसफाईसाठी कर्मचारी देणार!

पांडुरंग नगरात गटारी नसल्याने परिसरातील सांडपाणी एका डबक्यात जमा होते. नागरिकांनी गटारीची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. तसेच एका गल्लीत अमृत योजनेची पाईपलाईन एका गल्लीत टाकण्याची राहून गेली असल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदावी आणि रस्ता सपाटीकरण करावे अशा सूचना दिल्या. तसेच अमृत योजनेची पाईपलाईन देखील लवकरात लवकर टाकावी असे सांगितले.

उपमहापौरांनी ट्रकमालकाला दिली तंबी

पांडुरंग नगरच्या वळण रस्त्यावर एका व्यक्तीच्या तीन ट्रक अनेक महिन्यांपासून पडून असल्याने त्याठिकाणी मद्यपी दारू पितात तसेच ट्रकच्या आडोशाला काही लोक शौचास आणि मूत्र विसर्जन करण्यासाठी जात असल्याने त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ ट्रक मालकाला बोलावून तंबी दिली तसेच ट्रक आठ दिवसात न हटविल्यास कारवाई करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांनी काढले गौरवोद्गार

प्रभाग ९ मध्ये नागरिकांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र भैय्या पाटील यांच्या घरी देखील उपमहापौर सुनील खडके व नगरसेवकांनी भेट दिली. आपल्या प्रभागातील समस्या सांगतानाच त्या सोडविण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ऍड. रविंद्र पाटील यांनी काढले. उपमहापौर व सर्व नगरसेवकांचा ऍड.पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडी सरकारवर विश्वास दाखविला - जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री

November 7, 2020

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ; एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

October 26, 2021

शासनाच्या नियमांनुसारच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा : प्रकाश आंबेडकर

April 6, 2021

फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच : संजय राऊत

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group