धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात माऊली वारकरी शिक्षण संस्था आयोजित सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दणदणीत जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
आज दिनांक 5 फेब्रुवारी (रविवार) रोजी महंत ह.भ.प. श्री. महादेवजी महाराज गिरी. (जालनेकर) यांचे जाहीर दणदणीत कीर्तन हनुमान नगरमध्ये रात्री. 8.30 ते 10.30 वाजेच्या दरम्यान होणार आहे, तरी सर्व भाविक बंधू-भगिनींनी किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.