TheClearNews.Com
Saturday, June 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खानापूर नगरपंचायतीत भाजपचा भोपळा ; पडळकरांच्या पराभवाची महाराष्ट्राभर चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

खानापूर (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रतिष्ठेची केलेल्या खानापूर नगरपंचायतीत भाजपला महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत पडळकरांना जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर नेतृत्व करत असलेल्या भाजपच्या पँनलला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते आणि पाडळकरांच्या ‘व्यक्तिगत करिष्म्याचा’ त्यांच्या होम ग्राऊंडवरच पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

खानापूर नगरपंचायतीच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवली. काँग्रेसचे नेते सुहास शिंदे यांचा गटाने, शिवसेनेच्या पांडुरंग डोंगरे, लालासाहेब पाटील यांच्या गटाशी युती केली. हे दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन शिंदे, शिवसेनेचे राजाभाऊ शिंदे आणि अनिल शिंदे यांचे गट जनता आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

पडळकरांच्या व्यक्‍तिगत करिष्म्यावर चमत्कार घडवेल अशी अपेक्षा करत होते

तसेच भाजप प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या पक्षाच्यावतीने प्रथमच यावेळी १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उभा करून निवडणुकीत रंगत आणली होती. खानापूर नगर पंचायतीची निवडणूक जाहीर होताच भाजपच्यावतीने आपण संपूर्ण पॅनल टाकू अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा आमदार पडळकर यांनी केली होती. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज भरेपर्यंत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व्यक्‍तिगत करिष्म्यावर या निवडणुकीत काही चमत्कार घडवेल अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्त करीत होते.

तशा पद्धतीने आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर शहराच्या प्रत्येक प्रभागांमध्ये बैठका घेत जोरदार वातावरण निर्मितीही केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज भरेपर्यंत पडळकर बंधुंनी सर्व उमेदवारांच्या शिडात जणू आपण या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहोत अशी जबरदस्त हवा भरली. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना (इथे काँग्रेस,शिवसेनाआणि राष्ट्रवादीला) जणू खानापूरातून हुसकून लावणार अशा थाटाची नेहमीच्या स्टाईलने भाषण बाजीही केली.

खानापुरात नगरपंचायतीच्या निमित्ताने आपण प्रचारासाठी भाजपचे बडे नेते आणू अशी हूल उठवून देण्यातही आमदार पडळकर आणि स्थानिक भाजपाचे नेते यशस्वी झाले. परंतु प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे मात्र उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. निवडणुकीसाठी उभे केलेल्या उमेदवारांनी अनेक वेळा फोन करून ही केवळ शाब्दिक कसरती करून आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी वेळ मारून नेली असे आता भाजपा कार्यकर्तेच बोलत आहेत.

भाजपच्या उमेदवारांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाही

प्रत्यक्ष निवडणूक निकालाची आकडेवारी पाहिली तर, उभारलेल्या सगळ्या उमेदवारांना एकूण मिळून १०५ मते मिळाली आहेत. त्यात प्रभागवार पहिले असता प्रभाग क्रमांक १,४,५,७,८, १०, १२,१३,१५ या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता आलेला नाही. नाही म्हणायला ११ आणि ६ या प्रभागांमध्ये त्यांना दोन अंकी आकडा गाठता आला आहे. मात्र एकूणच विचार करता ज्या खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर राहतात त्या मतदार संघातील एकमेव असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नाही याचाच दुसरा अर्थ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व्यक्तिगत करिष्म्याचा हा होम ग्राऊंडवर झालेला पराभवच मानला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

व्हेंटिलेटर बदनामी प्रकरण : न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सकांची याचिका दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात विनापरवाना लाखोंचा खत साठा जप्त ; कृषि विभागाच्या पथकाची धडक कारवाई !

May 17, 2023

नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार ; जळगाव जिल्ह्यातील पाचही गावे शोकसागरात !

August 25, 2024

दिव्यागांच्या कारवाईत जि.प.चा ‘यूटर्न’

January 31, 2026

जळगाव ग्रामीण भाजप वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर !

April 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group