धरणगाव (प्रतिनिधी) देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व धरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मा. गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आज १४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात ५५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
धरणगावचे मा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, डॉ. मिलिंद डहाळे, जेष्ठ मोहन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस अरविंद देवरे, शहराध्यक्ष निलेश चौधरी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, संजय पाटील, सुनिल मोहरा मराठे, गुलाब महाजन, सागर वाजपाई, श्याम पाटील. भवरखेडा, उत्तम पाटील. बिलखेडा, पिंटु माळी. विवरे, नारायण चौधरी, ऐ. सी. पाटील, भुषण पाटील, आनंद पाटील, सागर भामरे किशोर निकम, भुषण पाटील, गिरीष पाटील, कल्याणे होळ, प्रफुल्ल पाटील, आफ्रोज पटेल, आकाश बिलावल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका व धरणगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.